Sanjay Raut Defamation Case : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या फौजदारी तक्रारीप्रकरणी (Defamation Case) माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी भाजप नेते आणि मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याविरुद्ध जामीन पात्र वारटं काढले आहे.
नितेश राणे यांच्याकडून 7 मे रोजी एक वक्तव्य करण्यात आले होते. येत्या 10 जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील, असे नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला होता. दरम्यान, याप्रकरणी माझगावच्या कोर्टात ही केस सुरू असताना नितेश राणेंनी दुसऱ्या कोर्टात या केसची सुनावणी व्हावी, अशी मागणी करत सेशन कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सेशन कोर्टाने नितेश राणेंची ही मागणी फेटाळली, त्यानंतरच्या दोन्ही तारखांना नितेश राणे हजर न राहिल्याने माझगाव कोर्टाने आत नितेश राणेंविरोधात जामीन वाॅरटं काढले आहे. त्यामुळे आता नीतेश राणे यांना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
सत्तांतराच्या नाट्यकाळात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं. मे 2023 मध्ये नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा उल्लेख साप म्हणून केला होता. यानंतर संजय राऊतांनी नितेश राणेंविरोधात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता.
संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. हे विधान म्हणजे माझी सार्वजनिक बदनामी असल्याचा आरोप करत संजय राऊतांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. संजय राऊत यांच्या याचिकेनुसार, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा 10 जून पूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा सार्वजनिक दावा नितेश राणे यांनी केला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नितेश राणेंनी हे वक्तव्य केलं होतं. या संदर्भात संजय राऊत यांनी तक्रार देखील दाखल केली होती. या प्रकरणी माजगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयामध्ये अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षापांसून संजय राऊत आणि नितेश राणे यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हे दोन्ही नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारपो करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:17 18-04-2026














