खेड : रामेश्वर आयटीआयमध्ये स्कॉन कंपनीतर्फे सेफ्टी प्रशिक्षण

खेड : तालुक्यातील दाभिळ येथील रामेश्वर आयटीआयमध्ये झिरो अपघात हे उद्दिष्ट ठेवून स्कॉन कंपनी च्या माध्यमातून प्रशिक्षणार्थी यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊन प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची पद्धत समजावून सांगितली.

तालुक्यातील दाभीळ येथील रामेश्वर आयटी आयमधील प्रशिक्षणार्थांना स्कॉन कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापक अधिकारी अविनाश पाटील यांनी सुरक्षितता म्हणजे काय, औद्योगिक क्षेत्रात सुरक्षिततेचे महत्व आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता, सुरक्षितता नियम याबाबत सखोल माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित कार्यपद्धतींबाबत जागरूकता निर्माण झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 19/Feb/2025