देवरूख क्र. २ शाळेत संगणक प्रशिक्षण सुरू

देवरुख : शहरातील जिल्हा परिषद देवरुख क्र. २ शाळेला अपनी पाठशाळा या संस्थेच्या माध्यमातून १० संगणक देण्यात आले. या संगणक कक्षाचे उद्घाटन बीटचे विस्तार अधिकारी तानाजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत शेट्ये, शाळा सुधार समिती अध्यक्ष बापू गांधी, सचिव रविकांत कदम, तुषार (मुन्ना) थरवळ, ज्यांनी हे संगणक मिळवून दिले ते आदरणीय विजय सराटे व मीना सराटे, केंद्रप्रमुख निकिता नलावडे, केंद्रप्रमुख भाटकर, शाळेतील शिक्षक वृंद, महाडिक, करंबेळे, राजेंद्र कदम, पवार उपस्थित होते.

शाळेतील प्रत्येक विद्यार्थी व शाळेच्या परिसरातील महिला यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल यशवंतराव यांनी सराटे यांच्या संस्थेकडे प्रयत्न करून सुसज्ज संगणक कक्ष शाळेत तयार केला आहे. याचा फायदा परिसरातील विद्यार्थ्यांना होणार आहे. शाळा सुधार समितीच्या माध्यमातून या संगणकाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 19/Feb/2025