दाभोळे-कनकाडी रस्त्याची तात्पुरती डागडुजी सुरू

साखरपा : दाभोळे कनकाडी रस्त्याची अखेर डागडुजी केली आहे. सततच्या अवजड वाहतुकीमुळे पडलेले खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले आहेत.

दाभोळे-कनकाडी हा सुमारे दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या वर्षी तीस लाख खर्च करून नव्याने बांधण्यात आला. यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकारण करण्यात आले; पण पावसाळ्यात या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती.

रस्त्यावर सातत्याने डंपरची वाहतूक सुरू असते. त्यामुळे वाहतुकीमुळे हा रस्ता जागोजागी उखडला होता. ठिकठिकाणी तयार झालेले खड्डे आणि त्या खड्ड्यांमध्ये टाकण्यात आलेली मोठी खड़ी यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी आणखीच धोकादायक झाला होता, या खडीवरून वाहने घसरून लहान-मोठे काही अपघातही झाले होते. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. रस्त्याच्या तात्पुरत्या पंचिंगचे काम सध्या सुरू आहे.

ज्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत आणि ज्या ठिकाणी अवजड वाहतुकीमुळे रस्ता साचला आहे त्या ठिकाणी खडी टाकून त्यावर डांबर ओतण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे काही काळ तरी या मार्गावरून वाहतू‌क सुरळीत होईल, अशी आशा ग्रामस्थ आणि वाहनचालक करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 20/Feb/2025