रत्नागिरी : शिवसेना नेते तथा माजी खासदार श्री विनायक राऊत यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक गुरुवार दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी १२.३० वा. शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय यशोधन अर्पाटमेंट अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी येथे होणार आहे.
माजी मंत्री रविंद्र माने, माजी आमदार बाळासाहेब माने, माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख संजय कदम, सहसंपर्कप्रमुख सचिन कदम, प्रभारी जिल्हाप्रमुख श्री.दत्तात्रय कदम व जिल्हा समन्वयक रविंद्र डोळस, जिल्हा समन्वयक श्री.संजय पुनसकर, जिल्हा समन्वयक मंगेश शिंदे, महिला लोकसभा संपर्क संघटक नेहा माने, जिल्हा संघटक वेदा फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना, महिला संघटक, युवासेना, शिवसहकार सेना पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहरप्रमुख व प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 20-02-2025
