देवरुख : शहरातील ललीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्याविष्कारातून ‘विरासत २०२५’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला. नृत्य अलंकार शिल्पा मुंगळे यांच्या मार्गदर्शनात मुला-मुलींनी नृत्ये सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला अजय पित्रे, भारती पित्रे, विरकर उपस्थित होते. यासाठी कुणाल भिडे, सोनम जाधव, यदुवीर चौगले, अमोघ पेंढारकर, संदीप पवार, स्कंधा गानू यांचे सहकार्य लाभले. ललीत कला अकादमीतर्फे कथ्थक, गायन, तबला ढोलकी वादन यामध्ये विद्यार्थी विविध पदव्या मिळवत आहेत. विरासत कार्यक्रमाला जि. प. चे माजी अध्यक्ष रोहन बने, अभिजीत हेगशेट्ये, नेहा माने, वेदा फडके, मृणाल शेट्ये, वैजनाथ जागुष्टे, सदानंद भागवत, युयुत्सू आर्ते, आशिष प्रभुदेसाई, सुशांत मुळ्ये, संजय मुंगळे, प्रा. पांडुरंग भिडे आदि उपस्थित होते. विद्यार्थी व मार्गदर्शिका शिल्पा मुंगळे यांनी सादर केलेल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 21/Feb/2025
