रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित २१ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. ठाणे येथील श्रीमती सुलोचना देवी सिंघानिया स्कूलतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘लहान मुलांची बाप गोष्ट’ बालनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पुणे-रमणबाग येथील न्यू इंग्लिश स्कूलतर्फे सादर करण्यात आलेले ‘माय सुपर हिरो’ नाटक व्दितीय ठरले. वाघेरे-इगतपुरी येथील आनंद तरंग फाऊंडेशनतर्फे सादर केलेल्या ‘हॅप्पी बर्थ डे’ नाटकाने तृतीय क्रमांक मिळविला.
दि. १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत रत्नागिरी येथील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. एकूण ३२ बालनाट्य सादर करण्यात आली होती. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संतोष आबाळे, गिरीष भुतकर, राजेश जाधव, संग्राम भालकर, राधिका शेट्ये यांनी काम पाहिले होते. विजेत्या संघाचे तसेच पारितोषिक प्राप्त कलाकारांचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:02 21-02-2025
