Narendra Modi, Delhi : “मी मराठीतून विचार केला तर मला ज्ञानेश्वरांच्या ओळी आठवल्याशिवाय राहत नाही. ” माझ्या मराठीची बोलू, परि अमृताताशीची पैजा जिंके”, या त्यांच्या ज्ञानेश्वरांच्या ओळी आहेत.
आरएसएसची स्थापना करणारेही मराठीच होते. गोळवलकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक बीज रोवलं होतं, त्याचा वटवृक्ष झालाय. 100 वर्षापासून संघ चालवत आहे. माझ्यासारख्या अनेकांना आरएसएसने देशासाठी जगायला शिकवलं. संघामुळेच मला मराठी भाषेशी संबंध आलाय”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, “फार छान” म्हणत मी भवाळकरांना म्हणालो. त्या म्हणाल्या ‘मने गुजराती आवडे छे’…देशाच्या आर्थिक राज्यातून देशाच्या राजधानी आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना माझा नमस्कार…समर्थ रामदास म्हणाले, ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ जिकडे तिकडे भाषा ही परिपूर्ण भाषण…शूरता आहे, वीरता आहे, समानता आहे. भारताला जेव्हा अध्यात्मिक ऊर्जेची गरज असते, तेव्हा मराठीतीली महान संतांनी ऋषींच्या भाषेला मराठी भाषेत आणलं.
पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, मराठी साहित्यात देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ज्ञानबा तुकारामांच्या मराठीला राजधानी अतिशय मनापासून अभिवादन करतो. पवारांमुळे या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली. आजतर जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही साहित्य संमेलनाचा दिवसही अतिशय चांगला निवडला.
सध्या देशभर ‘छावा’ चित्रपटाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचला. या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले.
पंतप्रधनानांनी या चित्रपटाचा उल्लेख थेट राजधानी दिल्लीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केला. पंतप्रधानांनी ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख करताच संपूर्ण सभागृहात जोरदार शिट्ट्या, घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. आजपासून दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
“सध्या तर, ‘छावा’ची धूम सुरू आहे…” –
मोदी म्हणाले, “आपली मुंबई महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. बंधूंनो जर मुंबईचा उल्केख आलाच आहे, तर चित्रपटांशिवाय ना साहित्याची चर्चा होऊ शकते ना मुंबईची. हा महाराष्ट्र आणि ही मुंबईच आहे, ज्यांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांनाही एका उंचीवर नेले आहे आणि सध्या तर, ‘छावा’ची धूम सुरू आहे.” पंतप्रधान मोदींच्या तोंडून ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख होताच, सभागृहात जोरदार शिट्ट्या, टाळ्यांचा कडकटात आणि घोषणा, असे दृष्य बघायला मिळाले. मोदी पुढे म्हणाले, “छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा या स्वरुपातील परिचय शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीनेच करून दिला आहे.”
महाठी भाषेची थोरवी सांगताना मोदी म्हणाले, मराठी सहित्यात विज्ञान कथांचीही रचना झाली. भूतकाळातही आयुर्वेद, विज्ञान आणि तर्कशास्त्रातही महाराष्ट्रातील लोकांचे मोठे योगदान दिले आहे. याच संस्कृतीमुळे महाराष्ट्राने नेहमीच नवे विचार आणि प्रतिभेला आमंत्रित केले आणि प्रगती साधली आहे.
भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर संस्कृतीची वाहक –
समर्थ रामदास स्वांमींचा उल्लेख करत मोदी म्हणाले, “भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते मात्र, भाषा समाजाच्या निर्मितीत तेवढीच महत्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या मराठीने महाराष्ट्र आणि राष्ट्रातील अनेकांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन आपली सांस्कृतीक जडणघडण केली आहे. यामुळे, समर्थ रामदास म्हणत होते,
‘मराठा तितुका मेळवावा।
महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे।
पुढे आनिक मिळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे।।”
मराठी एक संपूर्ण भाषा –
“मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरताही आहे आणि वीरताही आहे. मराठीमध्ये सौंदर्यही आहे आणि संवेदनाही आहे. समानताही आहे आणि समरसताही आहे. यात आध्यात्माचे स्वरही आहे आणि आधुकताही आहे. मराठीत भक्तीही आहे, शक्तीही आहे आणि युक्तीही आहे.” अशा शब्दात मोदींनी मराठी भाषेची महती सांगितली.
उषा तांबे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर दिल्लीतील पहिलं संमेलन पार पडलं. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचं संमेलन आहे. अब दिल्ली दूर नही है, असं म्हणायला लावणारं हे संमेलन आहे.
शरद पवार म्हणाले, साहित्य संमेलन दिल्लीला याचा आनंद आहे. मराठी माणूस झेंडा अटकेपार फडकवणारा आहे. तो दिल्लीत दिसतो, गुजरातमध्ये ही दिसतो. अखिल मराठी साहित्य महाराष्ट्राचे साहित्यिक या सगळ्यांनी एका गोष्टीचा पाठपुरावा केला, तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.यासाठी नरेंद्र मोदींबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. पहिलं दिल्लीतील मराठी साहित्य संमेलन झालं, त्याचं उद्धाटन पंडित नेहरुंनी केलेलं. त्यासाठी काकासाहेब गाडगीळांनी तयारी केलेली. नेहरुंनी त्या साहित्य संमलेनाचं उद्घाटन केलेलं, या साहित्य संमेलनाचं उद्घाटन नरेंद्र मोदींनं केलेलं. मला गुरुस्थानी असलेले यशवंतराव चव्हाण चांगेल साहित्यिक होते. मी 30 वर्षाहून अधिक काळ मराठी अस्मितेसाठी जे जे काही करता येईल, ते केलं म्हणून माझ्यावर स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. माझ्याकडे खंत व्यक्त केलेली, आतापर्यंत इतकी संमेलने झाले, पण फक्त चारच महिलांना अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. पण यावेळी एका महिला साहित्यिकाला हा मान मिळाला, याचा आनंद आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडलाला धन्यवाद देतो.
मराठेशाहीने आपला झेंडा अटेकपार फ़डकवला याचा मराठी साहित्यिकांना सार्थ अभिमान आहे.पाणिपतचा इतिहासही आपल्याकडे आहे. तो आपण काही विसरु शकत नाही.वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या साहित्यिकांनी देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली. मराठी भाषेची पताका नारायण सुर्वे….. यांच्यासारख्या कवींनीअण्णाभाऊ साठेंनी गावकुसावरील जगणं मराठी साहित्यात आणलं. संतांनी मराठी साहित्य समृद्ध केले. साहित्य संमेलन जाहीर झाल्यावर महाराष्ट्रात एक चर्चा सुरु होती राजकारण्यांचा इथं काय संबंध? माझं स्वच्छ मत आहे, राजकारण- साहित्यिक यांच्यातील परस्पर पूरक ..कलेला राजाश्रय या वादावर आता पडदा पडावा,असंही पवार यांनी नमूद केलंय.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 22-02-2025
