संगमेश्वर : ग्रामीण भागातील प्रौढ नागरिकांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हाभरात कार्यक्रम राबवले गेले आहेत. गावागावात सुरू असलेल्या नवसाक्षरतेच्या कामाचा शिक्षणाधिकारी किरण लोहार हे करत आहेत. कोसूंब बौद्धवाडी व कुडवली शाळेत भेटीसाठी गेलेल्या लोहार यांनी तिथे उपस्थित प्रौढांशी संवाद साधला.
प्रौढ निरक्षकांना साक्षर करण्यासाठी केंद्र शासनातर्फे नवसाक्षरता अभियान राबवले जात आहे. तालुक्यातील या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. त्यासाठी गावागावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवसाक्षर वर्ग घेतले जात आहेत. त्या वर्गातील प्रौढांची परीक्षा घेण्यात येते. या कार्यक्रमात लेखन, वाचन, गणिताबरोबरच डिजटल व्यवहार, मतदान, कॅलेंडरवाचन, दैनंदिन व्यवहारातील बाबी शिकवल्या जात आहेत. यावर शिक्षण विभागाच्या योजना कक्षाचे नियंत्रण आहे.
त्यासाठी शिक्षणाधिकारी किरण लोहार हे जिल्हाभरात नियोजन करत आहेत. त्यांनी संगमेश्वर तालुक्यामध्ये नवसाक्षरांचे चालत असलेल्या वर्गाचे काम पाहण्यासाठी कोसूंब-बौद्धवाडी व कुडवली शाळेला भेट दिली.
बौद्धवाडी, कुडवली येथील शाळांमध्ये चालत असलेले नवसाक्षर वर्गाचे कामकाज चांगले सुरू आहे. या वर्गातील प्रौढांकडून प्रतिसादही चांगला आहे. येथे येणारे प्रौढ वक्तशीर असून, गांभीर्यपूर्वक अभ्यास करत आहेत, ही समाधानाची बाब आहे.- किरण लोहार, शिक्षणाधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 22/Feb/2025
