रत्नागिरी: महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा वर्षा ढेकणे यांच्याकडून स्मिता लेले यांचा सन्मान

रत्नागिरी: चरवेली ग्रामपंचायतीत सरपंचपदी सौ. स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी स्मिता लेले यांच्या घरी जाऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक अभिनंदन केले.

स्मिता लेले या पूर्वी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव, सामाजिक जाणीव आणि प्रामाणिक कार्यपद्धती लक्षात घेता ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत सरपंचपदाची जबाबदारी दिली आहे.

निवडीनंतर बोलताना स्मिता लेले यांनी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निस्वार्थपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 27-04-2026