Maharashtra Weather:राज्यात गेल्या काही दिवसांपासून उष्ण झळा आणि उकाड्याने नागरिक हैराण झाले असून राज्यात येत्या काही दिवसात उन्हाचा चटका (Temperature Today) कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, इशान्य भारतात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तुरळक भागात जाणवणार असून हलक्या पावसाची (Rain) शक्यता या दोन भागांना देण्यात आलीय. 23 आणि 24 फेब्रुवारीला दक्षिण मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक भागात हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावतील असं प्रादेशिक हवामान केंद्राने सांगितलंय.उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे व शुष्क राहणार असून येत्या 2 दिवसात हळूहळू तापमानवाढ होणार असल्याचं सांगण्यात आलंय. (IMD)
हवामान विभागाचा अंदाज काय?
महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात तापमानाचा पारा वाढलेला राहणार आहे. विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. मात्र, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवस किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घटेल आणि त्यानंतर ते हळूहळू 2 ते 3 अंशांनी वाढेल. विदर्भात कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही.
IMD चे पुणे विभागाचे हवामानतज्ञ के.एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांना शुक्रवारी प्रचंड उकाडा अन् घामाच्या धारांना सामोरं जावं लागलंय. मुंबईतील सांताक्रूझ येथे 21 फेब्रुवारी रोजी तापमान 37.3 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, जे सरासरीपेक्षा 4.3 अंशांनी जास्त आहे. कोलाब्यात तापमान 34.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 3.7 अंशांनी अधिक आहे. पुढील दोन दिवस मुंबईत तापमान 36 अंश राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर हळूहळू घसरण होईल.
शुक्रवारी कुठे किती तापमानाची नोंद झाली?
अहिल्यानगर: 33.8°C (कमाल), 16.1°C (किमान)
बीड: 34.5°C (कमाल), 17.1°C (किमान)
चंद्रपूर: 38.3°C (कमाल), 20.0°C (किमान)
लातूर: 36.4°C (कमाल), 21.0°C (किमान)
नाशिक: 35.6°C (कमाल), 14.2°C (किमान)
पुणे: 36.1°C (कमाल), 16.4°C (किमान)
सातारा: 40.0°C (कमाल), 25.6°C (किमान)
मराठवाडा:
औरंगाबाद: 36.7°C (कमाल), 16.5°C (किमान)
लातूर: 36.4°C (कमाल), 21.0°C (किमान)
नांदेड: 35.2°C (कमाल), 18.5°C (किमान)
विदर्भ:
चंद्रपूर: 38.3°C (कमाल), 20.0°C (किमान)
नागपूर: 35.7°C (कमाल), 16.2°C (किमान)
वर्धा: 37.7°C (कमाल), 17.5°C (किमान)
उत्तर महाराष्ट्र:
धुळे: 17.3°C (किमान)
जळगाव: 35.6°C (कमाल), 14.2°C (किमान)
नंदुरबार: 40.0°C (कमाल), 14.3°C (किमान)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 22-02-2025
