पाकिस्तानात सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत वाजलं भारताचं..

Indian national anthem played in Lahore Aus vs Eng : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज या स्पर्धेतील चौथा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला जात आहे.

दरम्यान, अचानक येथे भारताचे राष्ट्रगीत वाजले, त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोन्ही संघांच्या राष्ट्रगीतादरम्यान हा प्रसंग पाहायला मिळाला. आता ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सामना ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचा अन् राष्ट्रगीत भारताचं

खरंतर, शनिवारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामन्यादरम्यान पाकिस्तानने मोठी चूक केली. जिथे त्यांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रगीताऐवजी चुकून भारताचे राष्ट्रगीत वाजवले. पीसीबीच्या या चुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळ्याआधी ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू झाले. त्यानंतर इंग्लंडचे होणार होते. पण अचानक भारतीय राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ चा आवाज येऊ लागला. हा आवाज ऐकू येताच संपूर्ण मैदानात एकच गोंधळ उडाला. इंग्लंडचे सर्व खेळाडूही स्तब्ध झाले. काही जण हसत होते, तर अनेक खेळाडू आश्चर्यचकित दिसत होते. हा क्षण आता सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना लाहोरमध्ये सुरू

या प्रकारच्या चुकीबद्दल पाकिस्तानच्या आयोजकांवर इंटरनेटवर जोरदार टीका होत आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गतविजेता ऑस्ट्रेलिया तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघांमधील सामना लाहोरमध्ये सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यांचा निर्णय गोलंदाजीने योग्य सिद्ध केला. हे वृत्त लिहिताना, इंग्लंडने 13 षटकांत 91 धावा केल्या आहेत आणि 2 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. फिल सॉल्टने 10 धावा आणि जेमी स्मिथने 15 धावा केल्या.

रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी दुबईमध्ये खेळला जाईल. भारत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. तो त्याचे सर्व सामने फक्त दुबईमध्येच खेळेल. जरी भारत अंतिम फेरीत पोहोचला तरी, विजेतेपदाचा सामना दुबईमध्येच होईल, तर पाकिस्तान या स्पर्धेचे यजमान आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:41 22-02-2025