चिपळुणात आज महाराष्ट्र मंदिर न्यासचे अधिवेशन

चिपळूण : हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणात महाराष्ट्र मंदिर न्यासचे अधिवेशन सोमवारी २४ रोजी आयोजित केले आहे.

बहादूरशेखनाका येथील पुष्कर सभागृहात हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात जिल्ह्यातील ५०० अधिक मंदिर प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

राजे महाराजांनी मंदिरांची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे रक्षण केले. आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही त्यांनी केला. मात्र, भारताने सेक्युलर वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीनच आघात होत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण आणि अशा सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या साधन संपत्तीत होणारे भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे मंदिरांची भूमी बळकावण्यासह वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे मंदिर संरक्षणासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ कार्यरत आहे.

मंदिराच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या मान्यवरांचा सहभाग या अधिवेशनात आहे. निवृत्त सहधर्मादाय आयुक्त सुनील देशमुख, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रक्रियांचे अभ्यासक साताऱ्याचे अधिवक्ता जनार्दन करपे, सनातनचे सत्यवान कदम, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, आदर्श मंदिर व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध असणारे स्वामी स्वरुपानंद सेवा मंडळ, पावसचे कार्याध्यक्ष जयंतराव देसाई यांच्यासह जिल्ह्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त पुजारी उपस्थित राहणार आहेत.

महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र
या अधिवेशनात मंदिरे सरकारीकरण मुक्त करणे, वक्फ कायद्याद्वारे मंदिरांच्या जमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणावर उपाय, मंदिर सनातन धर्मप्रचाराची केंद्रे बनवणे, पवित्र राखणे मंदिर व तीर्थक्षेत्रांचे ठिकाणी मद्य, मांस बंदी तसेच दुर्लक्षित मंदिरांचा जीर्णोद्धार, यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. हे अधिवेशन केवळ निमंत्रितांसाठी आयोजित केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 24/Feb/2025