माखजन : १४ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या शासन निर्णयाप्रमाणे अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २० टक्के वेतन अनुदान तत्काळ मिळावे, यासाठी राज्यमंत्री योगेश कदम यांची शिक्षकांनी भेट घेतली. त्यांनी याविषयीचा योग्य तो पाठपुरावा करतो, असे सांगितले.
पावसाळी अधिवेशनात तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी जून २०२४ पासून अंशतः अनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वाढीव २० टक्के वेतन अनुदान दिले जाईल, असे घोषित केले होते. नंतरच्या काळात १० ऑक्टोबर २०२४च्या मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ११०० कोटी रुपये इतक्या निधीला मंजुरी देत, २० टक्के वाढीव टप्पा वेतन अनुदान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
शासन निर्णयाला अनुसरून व तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घोषणेप्रमाणे जून २०२४ पासूनचा वाढीव २० टक्के वेतन अनुदानासाठी लागणारा निधी या अर्थसंकल्पात मजूर व्हावा यासाठी मंत्री योगेश कदम यांनी विशेष प्रयत्न करावेत म्हणून अंशतः अनुदानित शिक्षकांनी भेट घेतली. यावेळी प्रा. समृद्धी भुवड, प्रा. स्वाती खेडेकर, प्रा. बाजीराव चव्हाण, प्रा. विजयराजे दळवी प्रा. नंदकुमार गावडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 24/Feb/2025














