धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे सरकारचे प्रयत्न : मंत्री नितेश राणे

रत्नागिरी : इस्लामी राष्ट्राकडून होणारे अतिक्रमण थोपवण्याचे काम सर्वांनी मिळून करायचे आहे. धर्मांतरविरोधी कायदा आणण्याचे प्रयत्न सरकार करत आहे. सुदैवाने हिंदू समाजाला विश्वास देणारे सरकार सत्तेत आले आहे.

वक्फ बोर्डाने लाटलेल्या हिंदूंच्या जमिनी राखण्यासाठी प्रयत्न करू करणार असून सनातन बोर्डाची स्थापना करायला हवी, असे प्रतिपादन बंदर व मत्स्योत्पादन मंत्री नितेश राणे यांनी नाणीज येथील कार्यक्रमात केले.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते कोकणच्या विकासात महत्वाचा वाटा उचललेल्या नेत्यांचा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरविकास मंत्री नितेश राणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री व आमदार भास्कर जाधव, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम व सौ. पूजा निकम, उल्हास घोसाळकर यांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 24-02-2025