कोकणात उद्योग येणार कसे ? आणखी एका प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध

एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : कोकणात आणखी एका प्रस्तावित एमआयडीसीला ग्रामस्थांनी विरोध केलाय.ताही उद्योग आला कि त्याला विरोध करायचा हे मागील अनेक वर्षांपासून कोकणात चाललेले समीकरण आहे. रिफायनरी पासून अनेक उद्योग यामुळे रखडले असून कोकणातील तरुणाला आज रोजगारासाठी मुंबई, पुण्याला स्थलांतरित व्हावे लागत आहे. राज्य शासनाकडून वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. वाटद सहित कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, मिरवणे या भागात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. या एमआयडीसीला येथील स्थानिक ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्याकडून विरोध होत आहे. जमीन अधिगृहित करण्याबाबत ग्रामस्थांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. वाटद एमआयडीसी करिता २५०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भागातील २० हजार शेतकऱ्यांचा या जमीन संपादनाला विरोध आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या जागा घेत असाल तर याला आमचा विरोध राहील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने प्रथम जनसुनावणी घ्यावी व नंतरच जमीन संपादित करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

वाटद एमआयडीसी करिता २५०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भागातील २० हजार शेतकऱ्यांचा या जमीन संपादनाला विरोध आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या जागा घेत असाल तर याला आमचा विरोध राहील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने प्रथम जनसुनावणी घ्यावी व नंतरच जमीन संपादित करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

गणेशोत्सवाच्या देखाव्यात देखील विरोधाचा संदेश

राज्य शासनाकडून वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित करण्यात आली आहे. वाटदसहित कोळीसरे, कळझोंडी, गडनरळ, वैद्यलावगण, मिरवणे या भागात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. या एमआयडीसीला येथील स्थानिक ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्याकडून विरोध होत आहे. त्याची झलक शितप बंधूंनी साकारलेल्या घरगुती गणेशोत्सवातील देखाव्यातून दाखवली होती.
हा देखावा साकारताना एका बाजूला निसर्गसंपन्न वाटद गाव दाखवलेले होते. त्यामध्ये हिरवळीने नटलेली झाडे, गावातील पारंपरिक सौंदर्य, पिढ्यानपिढ्या सुरू असलेले उद्योग नैसर्गिक पाण्याचे स्रोत, भाजीशेती इतर व्यवसाय जैवविविधतेने नटलेले पूर्ण दाखवण्यात आले होते तर दुसऱ्या बाजूला एमआयडीसीतील प्रकल्प उभारण्यात आल्यानंतर होणारा बदल दाखवण्यात आला होता. प्रकल्प उभा राहिल्यानंतर होणाऱ्या प्रदुषणामुळे येथील निसर्गाची होणारी हानी कधीच भरून काढता येणार नाही. एमआयडीसी हटवा आणि कोकण वाचवा, असा संदेश या देखाव्यातून दिला होता.

वाटद एमआयडीसी करिता २५०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. या भागातील २० हजार शेतकऱ्यांचा या जमीन संपादनाला विरोध आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या जागा घेत असाल तर याला आमचा विरोध राहील असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासनाने प्रथम जनसुनावणी घ्यावी व नंतरच जमीन संपादित करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.