रत्नागिरी : साळवी स्टॉप येथे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील एका गॅरेजच्या मागे गावठी दारू विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवार, दि. २७फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४० वा. सुमारास करण्यात आली. विकास सुरेश सनगरे (४३, रा. मिरजोळे सनगरेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी संशयितांच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल बाळू पालकर यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यात २ हजार ११० रुपयांची १९ लिटर गावठी दारु विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात अधिक तपास शहर पोलिस ठाण्यामार्फत सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:58 AM 01/Mar/2025