चिपळूण : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान पर्वाला रविवारपासून सुरुवात झाली. शनिवारी (ता. १) चंद्रदर्शन झाल्यानंतर रविवारी मुस्लिम बांधवांनी पहिला उपवास धरला. यावर्षी कडक उन्हात रमजानचे उपवास असणार आहेत.
शनिवारी सांयकाळी सूर्यास्तानंतर मुस्लिम बांधवांच्या नजरा आकाशाकडे होत्या. चंद्रदर्शन झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी सर्वांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हिंदू बांधवानीही जवळच्या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत.
उपवास करण्यासोबतच या संपूर्ण महिन्यात आपले विचारही शुद्धता ठेवावे लागतात. आपल्या शब्दांनी कोणाचेही नुकसान न होणार नाही हेही आवश्यक असते. रमजानमध्ये उपवास सोडताना मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात फळांचा वापर करतात. पहाटेची अजान होण्यापूर्वी सहकुटुंब सहरी केली जाते. सायंकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडला जातो. काही जण सहकुटुंब घरात उपवास सोडतात तर काही जण मशिदीत एकत्र उपवास सोडतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 03/Mar/2025














