दापोली : दापोली शहराजवळील वळणे मिनी एमआयडीसीतील एका काजू कंपनीत हूक तुटून लिफ्ट अंगावर पडल्याने महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. प्रविणा प्रभाकर कासेकर असे त्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी ११.३० च्या सुमारास घडली.
वळणे एमआयडीसी येथील एका काजू फॅक्टरीत प्रविणी प्रभाकर कासेकर दुपारी ११.३०च्या सुमारास लिफ्टच्या खाली पडलेल्या काजूच्या बिया झाडूने जमा करीत असताना अचानक लिफ्टचा हूक तुटून लिफ्ट कासेकर यांच्या अंगावर पडली. त्यात प्रविणा जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी दापोलीच्या उपजिल्हा रुणालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 03/Mar/2025














