रत्नागिरी : जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांचा लाभ दिला जातो. या वर्षात ५३ कुटुंबांना या योजनेचा आधार देण्यात आला आहे.
ही योजना राष्ट्रीय सामाजिक साहाय्य क्रार्यक्रम (एनएसएपी) अंतर्गत (एमओआरडी) द्वारे राबविण्यात येत आहे. या योजनेत मृत्यूचे कारण काहीही असले तरी मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शोकप्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत दिली जाते.
स्थानिक चौकशीनंतर कुटुंबप्रमुख असल्याचे आढळून आलेल्या मृत गरीब व्यक्तींच्या कुटुंबातील हयात असलेल्या सदस्याला या योजनेचा लाभ दिला जातो. मात्र, स्थानिक चौकशीनंतर मृत गरीब व्यक्तींच्या कुटुंबातील जो सदस्य घरप्रमुख असतो त्यालाच एकरकमी २० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या विविध निराधार योजनांचा लाभ घेत असलेली एकूण ४९ हजार ९८५ कुटुंब आहेत. या कुटुंबाना शासनाकडून मदत केली जाते. यामध्ये अर्जरदार हा भारताचा नागरिक असावा, अर्जदाराचे कुटुंब दारिद्रयरेषेखालील (बीपीएल) जीवन जगत असले पाहिजे.
अर्जदाराच्या कुटुंबातील मुख्य कमावत्या व्यक्तीचा मृत्यू अपघाती अथवा नैसर्गिक कारणाने झालेला असावा. मृत कमावत्या व्यक्तीचे वय १८ वषर्षांपेक्षा जास्त आणि ६० वर्षापेक्षा कमी असावे अर्जदार हा कुटुंबाचा उत्तराधिकारी मुख्य कमविता असणे आवश्यक आहे. अशा पात्र व्यक्तीलाच २० हजार रुपये एकरकमी लाभ मिळतो. या योजनेतून मदत मिळण्यासाठी शासनाच्या https://nsap.nic.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा संबंधित तहसीलदारांकडे अर्ज करता येतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 04/Mar/2025














