दापोली : देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या देवरहाटीच्या भूमी शासनाने बेकायदेशीररित्या परस्पर घेतल्या आहेत, या सर्व भूमी शासनाने परत देवस्थानांच्या नावे पूर्ववत कराव्या, या मागणीसाठी तीन मार्च रोजी दापोली शहरातील केळसकर नाका येथे दापोली- मंडणगड तालुक्यातील मंदिर विश्वस्त, ग्रामस्थ धर्मप्रेमी एकत्र आले होते, महसूल अधिनियम व तरतुदींचे पालन न करता बेकायदेशीर रित्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासन अशी नोंद केल्याने भक्तगण, ग्रामस्थ, विश्वस्त यांच्यामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, हा असंतोष सनदशीर मार्गाने या आंदोलनाद्वारे प्रकट केला आहे. महाराष्ट्र शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन शासनाने तातडीने हा निर्णय घ्यावा असे एकमुखी मागणी विश्वस्तानी या आंदोलनाच्या द्वारे केली.
यावेळी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे दापोली तालुका संयोजक रमेश कडू, मंडणगड तालुका संयोजक सुरेश रेवाळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य लक्ष्मण गुरव, रत्नागिरी जिल्हा संघटक सुरेश शिंदे, जालगाव भैरी देवस्थानचे अध्यक्ष अशोक जालगावकर, साळूबाई देवस्थान मुगीज अध्यक्ष उदय गुजर, भैरी भवानी देवस्थान लाटवणचे किशोर कदम, श्री रामेश्वर मंदिर पिंपळगावचे रामदास कदम, काळेश्वरी देवस्थान वनौशी चे दीपक घडशे, महामाई देवस्थान करजगावचे किशोर कानसे, मारुती मंदिर हर्णेचे रमेश खोपटकर, भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, धाराई जाखमाता देवस्थान दमामे-तामोडचे जानू जाधव, भैरी देवस्थान गव्हेचे अरुण पालटे, हिंदू जनजागृती समितीचे दापोली तालुका समन्वयक परेश गुजराथी, हिंदू विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या अपर्णा कुलकर्णी, सनातन संस्थेचे दिनेश कडव यांचेसह विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसूलमंत्री यांना नावे निवेदन दापोली प्रांताधिकारी डॉ विजयकुमार सूर्यवंशी, आणि तहसीलदार श्रीमती अर्चना बोंबे-घोलप याना देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 04/Mar/2025














