खेड : महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे. बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे, यासाठी. ६ रोजी होणाऱ्या शांतता रॅलीला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याची माहिती पक्षाचे कोकण विभाग युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना सकपाळ म्हणाले, महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल. त्यामुळे १९४९ चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्ध असावेत, असा कायदा करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरात रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून, राज्यात रिपब्लिकन पक्ष लवकरच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन पुकारणार आहे. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी ना. आठवले प्रयत्न करणार आहेत.
खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ यांच्या वतीने ६ मार्च रोजी होत असलेल्या रॅलीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे खेड तालुक्यातील सर्व संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती सुशांत सकपाळ यांनी शांतता रॅलीबाबत सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 05/Mar/2025














