खेड : कोकण मार्गावर शिमगोत्सवासह उन्हाळी सुट्टी हंगामात रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी जाहीर केलेली उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशल २९ जूनपर्यंत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. ०९०५७/०९०५८ क्रमांकाच्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलच्या फेऱ्यांना रविवारपासून प्रारंभ झाला आहे. दर रविवार व बुधवारी घावणारी स्पेशल उघना येथून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळूर येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात गुरुवार व सोमवारी धावणारी स्पेशल मंगळूर येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी उधना येथे पोहचेल.
पहिल्याच दिवशी ‘उधना मंगळूर’ला दोन तासांचा विलंब
कोकण मार्गावर धावणाऱ्या उधना-मंगळूर साप्ताहिक स्पेशलच्या पहिल्याच फेरीला सोमवारी दोन तासांचा ‘लेट’ धावली. पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेसही तीन तास विलंबाने मार्गस्थ झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. २२ डब्यांची स्पेशल वसईमार्गे धावणार असून कोकण मार्गावर पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकात बांबे आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:54 PM 05/Mar/2025














