रत्नागिरी : वृक्ष लागवडीची मोहीम अखेर थांबवली

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (उत्तर) जिल्ह्यातील विविध मार्गावर करण्यात येणारी वृक्ष लागवडीची मोहीम थांबवली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, राजापुरात लावलेली झाडे उन्हामुळे करपून जात आहेत.

यामुळे लाखो रुपये खर्च करून राबवण्यात येणाऱ्या मोहिमेचा फज्जा वृक्ष लागवड थांबवली असून, जून महिन्यात ती करण्यात येणार असल्याची शासनाकडून गेल्या वर्षी या लागवडीचा कार्यक्रम आला होता; परंतु त्या मोहिमेकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. सचिव पातळीवरून याची दखल घेऊन कानउघाडणी झाल्यानंतर ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात राजापूर, लांजा, संगमेश्वर, देवरूख, रत्नागिरी आदी ठिकाणी वृक्षलागवडीची मोहीम हाती घेण्यात आली. खड्डा मारून त्यामध्ये झाड लावणे आणि तीन वर्षे त्याची देखभाल करणे यासाठी एका खड्याला साडेचार हजार रुपये याप्रमाणे जिल्ह्यात सुमारे साडेचार कोटींची दहा हजार झाडे लावण्यात येणार होती.

राजापूर, संगमेश्वर, रत्नागिरी-पावस, देवरूख आदी ठिकाणी झाडे लावण्यात आली; परंतु भर उन्हामध्ये हे वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे लागवड केलेल्यापैकी ५० टक्क्यांवर झाडे करपली आहेत.

त्यामुळे जिल्ह्यात या लागवडीला अनेकांनी विरोध केला होता. वाढता विरोध लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने उन्हाळ्यातील ही मोहीम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीचे हे काम थांबले असून, पावसाळ्यात जून महिन्यात ही लागवड करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.

Shoping fest Khabardar

मोहिमेचा फज्जा उडण्याची भीती
गेले दोन दिवस राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरीत ऐन उन्हात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिम होत होती. ऐन उन्हामध्ये झाडे पाण्याविना करपून गेली आहेत. त्यामुळे मोहिमेचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. मोहीम थांबवावी, अशी अनेकांची मागणी होती. बांधकाम विभागाने ऐन उन्हाळ्यात सुरू केलेली मोहीम थांबवली आहे.

रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यामध्ये ही वृक्ष लागवड सुरू होती. उन्हामध्ये झाडे करपत आहेत. त्यामुळे आम्ही ही मोहीम थांबवली आहे. जून महिन्यात पुन्हा वृक्ष लागवडीची मोहीम सुरू केली जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:49 PM 05/Mar/2025