संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी पुलावर खड्डेच खड्डे पडले असून, पूल धोकादायक बनलेला आहे, तसेच खड्यांचा अंदाज येत नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसाळा संपूनही हे खड्डे भरण्यात येत नसल्याने वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.
संगमेश्वरजवळच्या आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील सोनवी पूल धोकादायक बनलेला असतानाच पुलावरील खड्डे भरण्यास ठेकेदार कंपनीला तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळच नसल्याचे चित्र दिसत आहे. महामार्गावरील पुलांवर पडत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहने अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठेकेदार कंपनीसह बांधकाम गांधकाम विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनचालकांनी आणि पादचाऱ्यांनी केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सतीश पटेल यांनी ठेकेदार कंपनीला सांगितल्यानंतर तात्पुरते खड्डे भरले होते; मात्र त्यानंतर खड्डे पडूनही दुर्लक्ष केले जात आहे. सद्यःस्थितीमध्ये सोनवी पुलाचे काम सुरू आहे. सोनवी पुलाचे काम करत असताना योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे; मात्र कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू असल्याने पादचाऱ्यांना पुलावरून चालताना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 06/Mar/2025














