लांजा : महामार्गावर बसलेल्या गुरांवर धडकून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर लांजा रेस्ट हाऊस जवळची घटना असून बुधवारी संध्याकाळी ७.३० वाजता घडला अपघात घडला. अपघातात जखमी तरुण कुवे वाघरेवाडी येथील आहे. काळोखात बसलेली गुरे दुचाकीस्वाराला न दिसल्याने झाला अपघात झाला असून मोरेश्वर चंद्रकांत वाघरे (वय 38) असे जखमीचे नाव या घटनेनंतर मोकाट गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर मोकाट गुरे मालकाचा शोध घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 06/Mar/2025














