समग्र शिक्षा योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर बेमुदत उपोषण

रत्नागिरी : समग्र शिक्षा योजनेंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व व्यावसायिक अनुसार रिक्त पदावर समायोजन करावे किंवा त्याच पदावर सेवेत नियमित करावे. या प्रमुख मागणीसाठी समग्र शिक्षा अंतर्गत राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे मुंबईतील आझाद मैदानावर मंगळवार (दि. ४) पासून बेमुदत उपोषण सुरू असून, गुरुवारी तिसऱ्या दिवशी देखील हे उपोषण कायम आहे. यामुळे मात्र जिल्ह्यातील १०७ कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे.

समग्र शिक्षा योजनेंतर्गत कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित मागण्या आहेत. ‘आम्हाला कायम करा, अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या’ अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. मंगळवारी शंखनाद, घंटानाद, थाळीनाद भिक मांगो व बोंब मारो आंदोलन करत, कर्मचाऱ्यांनी मागण्यांकडे लक्ष वेले सायंकाळच्या सुमारास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय माध्यमातून सहायकांच्या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी चर्चेस पाचारण केले.

शासन कायम करण्याबाबत सकारात्मक आहे. समितीदेखील नियुक्त केली आहे. उपोषण मागे घेण्याची यावेळी करण्यात आली. मात्र, आम्हाला कायम करावे ही मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. सकाळपासून बुधवारी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. समग्र शिक्षा कर्मचारी १० ते २० वर्षांपासून शिक्षण विभागात कामे करत असून, यातील अर्ध्या कर्मचाऱ्यांना ८ ऑक्टोबर २०२४ शासन निर्णयाद्वारे सेवेत कायम केले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे शासनाने कायम केलेले नाही, असा आक्षेप आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 07/Mar/2025

Arihant 2