आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडाकडे जाण्यासाठी रस्ताच नाही

संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील महामार्गावरील आरवली येथील गरम पाण्याचे झरे दुर्लक्षित झाली आहेत. या ठिकाणी जाण्यासाठी चौपदरीकरणामुळे रस्ताच ठेवण्यात आलेला नाही.

आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडावर आंघोळ करण्यासाठी पर्यटक येत असतात. या पर्यटनस्थळाला दर्जा मिळाला आहे. सध्या या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे कुंडाच्या दोन्ही बाजूला मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. पुलाचे काम जोरात सुरू आहे. यामुळे गरम पाण्याच्या कुंडाकडे उतरण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. याबाबत येथील ग्रामस्थांनी ठेकेदाराला वारंवार सांगूनही त्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. गरम पाण्याच्या कुंडाशेजारीच ग्रामदेवतेचे जागृत मंदिर आहे. तिथे जातानाही ग्रामस्थांना अडचण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 07/Mar/2025