स्पृहा जोशी जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात १५वी
रत्नागिरी, दि . ३ : शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक १५, दामले विद्यालयाने यावर्षीही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इ . ५ वी व इ . ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये तब्बल २१ विद्यार्थी शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत चमकवले आहेत. विशेष म्हणजे स्पृहा चंद्रशेखर जोशी इयत्ता ५वी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १५वी आली आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे दामले विद्यालयातर्फे रथातून मिरवणूक काढत अभिनंदन करण्यात आले .
शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी याप्रमाणे : (पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ . ५वी) स्पृहा चंद्रशेखर जोशी जिल्ह्यात प्रथम, राज्यात १५वी ( २७२ ), हर्षवर्धन सचिन पाटील जिल्ह्यात १२वा ( २५२ ), आयुष अनिरुद्ध जोशी जिल्ह्यात २१ वा ( २३८ ), उमेर वसीम सय्यद जिल्ह्यात ३५वा ( २२८ ), दाक्षी उमेश शिंदे जिल्ह्यात ३६ वी ( २२६ ), ईश्वरी रमाकांत डिंगणे जिल्ह्यात ६१ वी ( २१६ ), साधना संजय लिंगायत जिल्ह्यात ६२वी, ( २१६ ), स्वाती गंभिरानंद मदने जिल्ह्यात ६५वी, २१४, आराध्या दिपक रानडे जिल्ह्यात ९८वी ( २०६ ), स्मित संदीप मांडवकर जिल्ह्यात ११४वा ( ११४ ), प्रिती राजेश जाधव जिल्ह्यात ११७ वी ( २०२ ) .
इयत्ता पाचवीच्या वर्गाला सौ . श्रद्धा गांगण, श्री . योगेश कदम, श्री . मुकेश पाटील, श्री . इरफान शेख या शिक्षकांनी मार्गदर्शन केले .
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक : ओम हरिश्चंद्र वरेकर जिल्ह्यात ९वा ( २५२ ), श्रेया सचिन खंदारे जिल्ह्यात २९ वी ( २३० ), सई मनोज जोशी जिल्ह्यात ३५र्व ( २२६ ), सावनी आल्हाद आठलेकर जिल्ह्यात ४२ वी (२२२ ), आराध्य देवेंद्र डेंगळे जिल्ह्यात ४३वा ( २२२ ) ईशा विशाल चव्हाण जिल्ह्यात ७५वी ( २०६ ), राज रमेश कोकरे जिल्ह्यात ८४ वा ( २०२ ), सिद्धी संदीप स्वामी जिल्ह्यात ९२वी ( १९६ ), आसावरी सौरभ अवताडे जिल्ह्यात ९३ वी ( १९६ ), स्वराज संजय लिंगायत जिल्ह्यात ९४ वा ( १९६ ) . या विद्यार्थ्यांना सौ . मंजिरी लिमये, सौ . सिद्धी विचारे, श्री . रवींद्र शिंदे, श्री . अक्षय जोगळेकर, श्रीम . ज्योती डंबाळे यांनी मार्गदर्शन केले .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगराध्यक्ष सौ . शिल्पाताई सुर्वे, प्रशासन अधिकारी प्रा . श्री . सुधाकर मुरकुटे व्यवस्थापन समिती अध्यक्ष मिलिंद संसारे, मुख्याध्यापक श्री . भगवान मोटे यांनी विशेष अभिनंदन केले आहे .
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
18:07 03-07-2026














