संगमेश्वर : कोंडअसुर्डे नदीवरील कॉजवे धोकादायक

संगमेश्वर : तालुक्यातील मौजेअसुर्डे आणि कोंडअसुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवरील कॉजवेची दयनीय अवस्था झाली आहे. डिंगणी-शास्त्रीपूल मुख्य मार्गावरून संगमेश्वर येथे येण्यासाठी अगदी जवळचा मार्ग म्हणून येथील कॉजवे महत्त्वाचा आहे; परंतु कॉजवेची दुरवस्था झाली असून, पावसाळ्यात त्यावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद होते. त्यामुळे कॉजवेची दुरुस्ती न करता उंची वाढवून नवीन पूल उभारण्याची मागणी धरू लागली आहे.

मौजेअसुर्डे आणि कोंडअसुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवर असलेल्या कॉजवेवरून डिंगणीमार्गे संगमेश्वर येथे येण्यासाठी जवळचा मार्ग आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या गावांतील लोकांना तसेच शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाहनाने अथवा पायी ये-जा करण्यासाठीही या मार्गाचा वापर केला जातो. सुमारे वीस वर्षांपूर्वीच्या कॉजवेवर मोठे खड्डे पडले आहेत. काँक्रिट उखडले आहे. पावसाळ्यात येथील नदी दुथडी भरून वाहते तसेच पाण्याचा प्रवाहसुद्धा मोठ्या प्रमाणातच असतो. अशा वेळी कमी उंची असलेला हा कॉजवे महिन्यातील कित्येक दिवस पाण्याखालीच असतो. त्यामुळे शास्त्रीपूलमार्गे संगमेश्वर गाठावे लागते. या कॉजवेची दुरुस्ती न करता नवीन पुलाची उभारणी करावी, अशी मागणी केली जात आहे.

तातडीने उपाययोजना करा
तालुक्यातील मौजे असुर्डे आणि कोंड असुर्डे या दोन गावांमधून वाहणाऱ्या नदीवरील कॉजवेची अवस्था दयनीय झाली आहे. नदीवर असलेल्या कॉजवेवरून डिंगणीमार्गे संगमेश्वर येथे येण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. नदीच्या दोन्ही बाजूच्या गावातील विद्यार्थी, नागरिक ये-जा करण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. सध्या कॉजवेवर मोठे खड्डे पडले आहे. अनेक ठिकाणी कॉक्रिट उखडले आहे. याचा विचार प्रशासनाने करून तातडीने आवश्यक त्या उपययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 08/Mar/2025

Tata aeris