मंडणगड : मंडणगड आगाराच्या वतीने 7 मार्च 2025 रोजी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात आला. या निमीत्ताने आगार व्यवस्थापनाने तालुक्यातील नागरीकांच्या विविध मागण्यात व तक्रारींची लेखी नोंद घेतली व नागरीकांच्या तक्रीरीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करुन त्यांचा माहीती तक्रारदाराना देणार असल्याचे स्पष्ट केले.
याचबरोबर मंडणगड आगारात लवकरच नव्या गाड्या दाखल होणार असल्याने आगाराचे रोजचे मायलेज वाढवून आगाराचे उत्पन वाढवून तोटा कमी करण्यासाठी स्थानीक व्यवस्थापन विशेष प्रयत्न करीत असल्याचे प्रवाशांच्या मागणीनुसार नवीन प्रवासी फेऱ्या सुरु करणार असल्याचे आगार व्यवस्थापनाने या निमीत्ताने स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:06 PM 08/Mar/2025














