रत्नागिरी : उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच मारूती मंदिर येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना सदस्य नोंदणीला सुरवात करण्यात आली. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित आणि शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. शिवसेना पक्ष अधिक मजबूत व्हावा, या उद्देशाने पक्षाने कार्यवाही सुरू केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाप्रमुख पंडित यांनी सांगितले. या वेळी राजन शेटये, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, निमेश नायर, विजय खेडेकर, बाबा नागवेकर, बंटी कीर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:03 08-03-2025














