रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरुख आगाराला बीएस ६ प्रणालीच्या २८ नवीन बस

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील विविध आगारांना नवीन बस मिळाल्या आहेत. यानुसार रत्नागिरीला ५, राजापूर साठी ५, लांजा साठी ८ आणि देवरुख साठी १० बसेस येणार आहेत. या नवीन बसेस रजिस्ट्रेशन होऊन तयार असून येत्या काही दिवसातच त्या आगारात दाखल होणार आहेत.

एसटी महामंडळाकडून महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी विविध योजनेंतर्गत सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेसह अद्ययावत सुविधा देण्यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने दरवर्षी नवीन बीएस ६ प्रणालीच्या पाच हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:47 08-03-2025