रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची रोकड असलेली बॅग लंपास

रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी महिला झोपलेली असल्याची संधी साधत अज्ञाताने रोख ३५ हजार रुपये असलेली बॅग लांबवली. चोरीची ही घटना त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसमध्ये १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या सुमारास सुमारास रत्नागिरी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या बाबत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार दि. १३ फेब्रुवारी रोजी ती त्रिवेंद्रम राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीतील निजामुद्दीन जंक्शन ते गोवा असा प्रवास करत होती. प्रवासादरम्यान ही झोपलेली असल्याची संधी साधत अज्ञाताने तिची बॅग लांबवली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 10/Mar/2025