खेड : लोटे एमआयडीसीत भीषण आग

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील आल्ड्रफ केमिकल च्या नावे असलेल्या बंद प्लॉटमध्ये रविवार ९ रोजी दुपारी दोन वाजता आग लागली. यावेळी हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली.

दीड तासांनी औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलातील जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले. ज्या प्लॉटमध्ये आग लागली, तेथे कोणताही कारखाना नसल्यामुळे मानवी जीवनाला धोका पोहोचला नसला तरी दुसऱ्या कंपनीने त्यांचे साहित्य ठेवले होते, त्याचे नुकसान झाले आहे.

कोकणातील रासायनिक कारखाने असलेली औद्योगिक वसाहत म्हणून लोटे औद्योगिक वसाहत ओळखली जाते. ९ रोजी दुपारी दोन वाजता अल्ड्रफ केमिकलच्या प्लॉटमध्ये आग लागली. यावेळी या प्लॉट वर हिंदुस्तान युनिलिव्हर नामक कारखान्याला आपले साहित्य ठेवण्यासाठी ते प्लॉट भाड्याने दिला गेला असल्याची बाब निदर्शनास आली. त्या कंपनीच्या साहित्याला आग लागली. औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. दीड तासांनी आग नियंत्रणात आली.

औद्योगिक वसाहतीत तपासणीची गरज..
लोटे औद्योगिक वसाहतीत सतत लागणाऱ्या आगी, कारखान्यातील अपघात व प्रदूषण यामुळे येथील घटना चर्चेत असतात. शासनाला महसूल व रोजगार देणारी औद्योगिक वसाहत आहे. मात्र, कित्येक वेळा कारखानदारांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा कारणीभूत असतो. मात्र एमआयडीसी, एमपीसीबी आणि कारखाने निरीक्षक हे अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचा आरोप पंचक्रोशीतील नागरिक करत असतात. गेल्या अनेक वर्षांत सरकारने या वसाहतीत महसूल, औद्योगिक विकास महामंडळ व प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यामार्फत पाहणी केलेली नाही

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 10/Mar/2025