संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री येथे सुरुचे झाड कोसळल्याने महामार्ग अर्धा तास ठप्प झाला. संबंधित विभागाने याकडे लक्ष न दिल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अर्धा तास होऊन अधिक काळ वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री येथे दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास एक सुरूचे झाड महामार्गावर मधोमध पडल्याने वाहतूक ठप्प झाली.
कंटेनरसह अनेक मोठ्या गाड्या या मार्गावर दोन्ही बाजूने अडकल्या. महामार्ग विभागाला या संदर्भात माहिती कळवून हे जवळपास अर्घा पाऊण तास झाला तरी यंत्रणा दाखल झालेली नव्हती त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढत गेली. जवळपास एक ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या कोणतेही वाहन जाण्यास मार्ग नसल्याने वाहन चालक हैराण झाले. छोटी वाहने उक्षी करबुडे मार्गाने रवाना झाली.
मात्र मोठी अवजड वाहने यामध्ये अडकली. त्याचबरोबर एसटी बस सुद्धा खोळंबल्या होत्या. आधीच रस्त्यांवरील उन्हाच्या वाफानी वाहन चालक हैराण झालेले असताना त्यातच या वाहतूक कोंडीचा फटका वाहनधारकांना बसला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 10/Mar/2025














