चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी येथील सोनक टोयोटा कंपनीचे शोरूममध्ये सेल्स ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या गणेश बळीराम कराडकर याने १२ लाख ६१ हजार ४८१ रुपयांचा अपहार केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी त्याच्यावर शनिवारी येथील पोलीस स्थानकात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रविकुमार विजय जाधव (४१) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार गणेश बळीराम कराडकर याने १२ डिसेंबर २०२४ ते १७ फेब्रुवारी २०२५ या मुदतीत चिपळूण खेर्डी येथील सोनक टोयोटा कंपनीचे शोरूममध्ये सेल्स ऑफिसर म्हणून नोकरीस असताना या कंपनीचे ग्राहक शाम पांडुरंग बहुतले व दुसरे ग्राहक अबरार अकबर कौचाली यांच्याकडून अनुक्रमे ७ लाख ३० हजार रुपये व ५ लाख ३१ हजार ४८१ रुपये, असे एकूण १२ लाख ६१ हजार ४८१ रुपये रोख व गुगल पेद्वारे स्वतःच्या बँक खात्यात जमा केले. मात्र त्यानंतरही कंपनीचे बैंक अकाऊंटवर किंवा कॅशिअरकडे जमा न करता ती रक्कम परस्पर स्वतःच्या फायद्याकरीता वापरली. त्यानुसार गणेश बळीराम कराडकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 10/Mar/2025














