रत्नागिरी : खालगाव धामणेवाडीत डंपरची धडक बसून विद्युत डीपीसह केबलचे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील खालगाव धामणेवाडी येथे बेदरकारपणे डंपर चालवून तेथील केबलला धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.४५ वा. सुमारास घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी तक्रार दिलली आहे. त्यानुसार, खालगाव धामणेवाडी येथे इलेक्ट्रिक डीपी ते जिओ मोबाईल टॉवरदरम्यान वरील बाजूने एक जाड केबल ओढलेली आहे. अज्ञात डंपर चालकाने त्या केबलला हौद्याची धडक देत इलेक्ट्रिक डीपी व लोखंडी पोलाचे नुकसान केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 11/Mar/2025