पावस-युक्ता फाउंडेशनतर्फे आजपासून नवदुर्गा यात्रासहल

पावस : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या युक्ता फाउंडेशनच्या सहकार्याने ५ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी, शिवसेनेच्या कार्यकर्त्या, सामान्य महिलांसाठी मोफत नवदुर्गा यात्रा सहल आयोजित केली आहे.

सहलीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन नारी शक्तीच्या जागराचे प्रतीक असलेल्या नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये पावस, मेर्वी मार्गावरील भगवती, नवलाई, महालक्ष्मी, आडिवरे येथील महाकाली, आदी मंदिरांना भेट देण्यात येणार आहे. बस रहाटागर येथून सकाळी ८ वा. सुटणार असून, सर्वांनी सकाळी पावणेआठ वाजता रहाटागर येथे उपस्थित राहणे गरजेचे आहे. आपल्यासोबत पाणी बॉटल, नाश्ता, औषधे सोबत घेणे गरजेचे आहे. या सहलीमध्ये दुपारचे जेवण योग्य त्या ठिकाणी देण्याची सोय करण्यात आली आहे. यात्रेसाठी नावनोंदणीसाठी रचना महाडिक, मनीषा बामणे, विजया घुडे, सायली पवार, अनिषा नागवेकर यांच्याशी संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 05-10-2024