रत्नागिरी : कोकणनगर येथील चायनीज सेंटरमागे मटका चालवणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरानजीकच्या कोकणनगर येथील एका चायनीज सेंटरच्या मागे कल्याण मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० वा. सुमारास करण्यात आली. असिफ फक्रुद्दीन काद्री (६०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

गुरुवार, दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी संशयित असिफ काद्री हा कोकणनगर येथील एका चायनीज सेंटरच्या मागे लोकांकडून पैसे स्वीकारून बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवत होता. त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 05-10-2024