चिपळुणातील नवसाक्षर वर्गाला शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

चिपळूण : जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी चिपळूण तालुक्यातील नवसाक्षर वर्गाला नुकतीच भेट दिली. ग्रामीण भागातील प्रौढ नागरिकांना साक्षर करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हाभरात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. गावागावात सुरू असलेल्या नवसाक्षरतेच्या कामाचा शिक्षणाधिकारी योजनाचे किरण लोहार यांनी आढावा घेतला.

चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ओझरवाडी शाळेतील नवसाक्षरता वर्गांना भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन अध्यापनाचा आढावा घेतला. शैक्षणिक साहित्यांच्या आधारे नवसाक्षरांनी चित्र वाचन व शब्द वाचन उत्तम प्रकारे केले. त्याचबरोबर नाणी व नोटांच्या मदतीने तोंडी गणिते सोडवली. प्रत्यक्ष स्वयंसेवकांशी संवाद साधण्यात आला.

चिपळूण तालुक्यामध्ये नवसाक्षर वर्गाचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी दादासाहेव इरनक, नोडल अधिकारी तथा शिक्षण विस्तार अधिकारी सौरवी जाधव, ओझरवाडी शाळेचे पदवीधर शिक्षक पांडुरंग कदम, उपशिक्षिका सुप्रिया साळुंखे उपस्थित होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 13/Mar/2025