दापोली : अडखळ तरीबंदर येथील मच्छीमारी जेटीवर वाहने लावण्यावरून बुधवारी (ता. १२) सायंकाळी दोन गटांत झालेल्या दगडफेकीच्या व हाणामारीच्या घटनेत १४ जण जखमी झाले. त्यांच्यावर दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. दक्षतेचा भाग म्हणून दापोलीत दंगल प्रतिबंधक तुकडी तैनात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांची संयुक्त बैठक घेतली.

दगडफेकीत शकूर तहीरा हसबा, (वय ४८), मयुरेश विजय पाटील, फरहान युनुस वाकणकर, सैफ यासीन सोलकर, इरफान अहमद शिरगावकर, निसार इस्माईल सोलकर, अहमद हारून शिरगावकर, भगवान हरिश्चंद्र चोगले, हुसेनमियाँ अली शानदार, अकीला शब्बीर कुरये, जयेश हरेश्वर पाटील, अंश जयेश चोगले, परशुराम दामू चोगले, नारायण विजय पाटील हे १४ जण जखमी झाले आहेत.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अडखळ येथे भेट दिली. पोलिस ठाण्यात दोन्ही गटांची गुरुवारी (ता. १३) बैठक घेऊन पाजपंढरी व अडखळ येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी विनंती केली. शिमगा सण व मोहरमच्या पार्श्वभूमीवर पुन्हा असा प्रकार होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी, असेहो सांगितले. या वेळी शिवसेनेचे किशोर देसाई, पप्पू रेळेकर, उन्मेष राजे आदी पदाधिकारी, दापोलीचे उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, उपविभागीय पोलिस अधिकारी भागोजी आवटी, पोलिस निरीक्षक विवेक अहिरे उपस्थित होते.
दरम्यान, पाजपंढरी व अडखळ येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, योगेश धर्मराज चोगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डंपरचे व मोटारीचे मोबाइलवर फोटो काढत असताना वाद झाला. त्यावेळी परशुराम दामोदर चोगले, जयेश हरेश पाटील, नितेश विजय पाटोल, मयुरेश विजय पाटील, दर्शन रमेश तबीब, केदार भालचंद चोगले, अंश जनार्दन चोगले, गणेश जनार्दन चोगले, भगवान लाया चोगले, गजानन जनार्दन रघुवीर, अंकुश नरेश दोरकुळकर यांना चारचाकीमधील एका अनोळखीने व माक्षम सोलकर, शाहरूख वाकणकर, निसार इस्माईल सोलकर, फरहान इमोस वाकणकर, शकूर ताहीर हसबा, इसहाक हसबा व त्यांचा मुलगा, अहमद हसन शिरगावकर, सैफ यासीन सोलकर, मजीद वाकणकर, अफान बागकर, विलाल इक्बाल पटेल, मुजम्मील जैतापकर, मुबारक पटेल, फैसल, सिद्धिक, अजीम, अलतम्स आदीनी काठ्या व दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे.
इरफान अहमद शिरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयुरेश विजय पाटील, अंश जयेश चोगले, परशुराम दामू चोगले, नारायण विजय पाटील, दर्शन रमेश तबीब, ज्ञानेश्वर धर्मराज चोगले, योगेश धर्मराज चोगले, जयेश हरेश्वर पाटील, नितेश विजय पाटील, केदार भालचंद्र चौगले, गणेश जनार्दन चोगले, भगवान लाया चोगले, गजानन जनार्दन रघुवीर, अंकुश नरेश दोरकुळकर या १४ जणांनी जमाव करत इरफान शिरगावकर व चालक जैफ वाकणकर यांना मारहाण केली. तसेच घरावर आणि वाहनावर दगड मारून नुकसान केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 15/Mar/2025














