चिपळूण : शिमगोत्सवादरम्यान गर्दीमध्ये धक्का लागल्यावरून हाणामारी; १ गंभीर

चिपळूण : शहरातील पेठमाप येथे शिमगोत्सवादरम्यान गर्दीमध्ये धक्का लागल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतील भेंडीनाका येथे घडली. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

याप्रकरणी रोहित साळुंखे व त्याच्या एका मित्रावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद अक्षय ओतारी (३५, बाजारपूल) यांनी दिली आहे. पेठमाप येथे गर्दीमध्ये अक्षय ओतारी याचा चुलत भाऊ वरद ओतारी याच्या मित्राला रोहितच्या मित्राचा धक्का लागला. यातून वाद झाला. नंतर तो मिटविण्यात आला.

असे असताना अक्षय, वरद ओतारी व त्याचे नातेवाईक रोहितच्या मित्राला जाब विचारण्यासाठी गेले होते. यातूनच रोहित व त्याच्या मित्राने अक्षय व वरदला मारहाण केली. अक्षयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 15-03-2025

Happy journey