डेरवण युथ गेम्स : राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत ठाणे, पुणे, सांगली विजयी

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट्च्या माध्यमातून सुरू असलेल्या ११व्या डेरवण युथ गेम्स खो-खो स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग पुणे (मुले), राजमाता अहिल्याबाई होळकर क्रीडामंडळ सांगली (मुली) यांनी तर १८ वर्षांखालील गटात शिवाजी तरुण मंडळ भडकंबे सांगली (मुले) आणि मुलीच्या गटात ठाण्याच्या रा. फ. नाईक महिला खो-खो संघाने विजेतेपद पटकावले.

गटातील चारही विजेत्या संघांना रोख रक्कम व नायक देण्यात आला. स्पर्धेतील १२ वैयक्तिक पारितोषिक विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम देण्यात आली. स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात उत्कृष्ट संरक्षक म्हणून ओकार सावंत विहंग (ठाणे), प्रणिती जगदाळे फ. नाईक (ठाणे) उत्कृष्ट अथर्व पाटील- भडकंबे (सांगली), व वैष्णवी जाधव रा फ नाईक ठाणे यांना गौरविण्यात आले. १४ वर्षांखालील सरंक्षक ओम दिगरे रमणबाग पुणे श्रावणी तम्कडे राजमाता सांगली उत्कृष्ट संरक्षक ओम डिंगरे-रमणबाण (पुणे), श्रावणी तामखडे राजमाता (सांगली), उत्कृष्ट आक्रमक कार्तिक साळुंखे (संभाजीनगर), अश्विनी गावडे क्रीडा प्रबोधिनी (जालना) तर अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशांत कोळी रमणबाग (पुणे), व वैदिका तामखडे राजमाता (सांगली) यांना गौरवण्यात आले. किशोर गटातील अंतिम सामन्यात रमणबाग (पुणे) संघाने राजर्षी शाहू (संभाजीनगर) संघावर पाच गुणांनी विजय मिळवला, रमणबाग संघाकडून ओम डिंगरे याने नाबाद ३.०० मि. व २.०० मि. संरक्षण करून एक गाडी बाद केला. सुशांत कोळीने १.४० मि. २.५० मि. व तीन गडी बाद केले. संभाजीनगर संघाकडून आदित्य शिंदेने १.०० मि २.४० मि. संरक्षण केले. मुलीच्या गटात राजमाता (सांगली) संघाने जालन्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघावर एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला.

१८ वर्षाखालील मुलांच्या गटात भडकंबे (सांगली) संघाने विंहग ठाणे वर १८-९ असा ९ गुणांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले, मुलीच्या गटात रा. फ. नाईक (ठाणे) संघाने काळे प्रशाला (सोलापूर) वर ३.३० मि. राखून विजय मिळवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 15/Mar/2025