चिपळूणमध्ये बारदानाच्या गोदामाला भीषण आग

चिपळूण : गेल्या काही दिवसांत चिपळूणमध्ये वणवा लागण्याच्या सातत्याने घटना घडत आहेत. यामुळे जैवविविधतेचे नुकसान होत आहे. शिवाय आंबा- काजू बागांदेखील भक्षस्थानी पडत आहेत. या घटना ताज्या असतानाच सोमवारी चिपळूण-गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदामातील बारदान जळून खाक झाले आहे. ही आग विझविण्यासाठी चिपळूण नगर परिषद आणि लोटे औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.

गेल्या काही दिवसांमध्ये चिपळूणात वणवा लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. डोंगररांसह सपाटी मैदानात देखील वनवे लागत आहेत. यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. शिवाय आंबा काजूच्या बागा देखील आगीत होरपळून बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा वणव्यामुळे चिपळूण गुहागर बायपास मार्गावरील भानुशाली यांच्या बारदानाच्या गोदामाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. ही आग इतकी तीव्र होती की आगीच्या धुराचे लोळ बाहेर पडताना दिसत होते. ही घटना समजतात चिपळूणवासीयांनी घटनास्थळी धाव घेतली. तर चिपळूण नगरपरिषद व लोटे औद्योगिक वसाहती मधील अग्निशमन दलाने देखील धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र, भर दुपारी आग लागल्याने ही आग सातत्याने भडकत होती. मात्र तोपर्यंत आगीमध्ये गोडाऊन मधील बारदान जळून खाक झाले. एकंदरीत भानुशाली यांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:40 PM 17/Mar/2025