निवळी फाटा येथे मित्राचीच दुचाकी घेऊन ठोकली धूम; पोलिसात गुन्हा दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निवळी फाटा येथे मित्राच्या दुचाकीची मागणी करून ती परत न करणाऱ्या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना मंगळवारी, 18 मार्च 2025 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संशयित फरार असल्याचे समजते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश वामन सावंत (वय 27, रा. निवळी, रत्नागिरी) यांची दुचाकी (क्रमांक: MH-08-AV-4637) त्यांचा मित्र ज्ञानेश्वर गोटूराम जाधव (रा. जळगाव) याने बाथरूमला जाण्यासाठी नितेशची दुचाकी मागितली. नितेशने मित्रावर विश्वास ठेवून त्याला दुचाकी दिली. मात्र, बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन गेलेला ज्ञानेश्वर परत आलाच नाही.
काही वेळ वाट पाहिल्यानंतर नितेशला संशय आला आणि त्याने आजूबाजूला शोधाशोध केली. परंतु, ज्ञानेश्वर आणि दुचाकी दोन्ही गायब झाल्याचे लक्षात येताच त्याला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्याने तातडीने ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि ज्ञानेश्वर जाधवविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:48 AM 21/Mar/2025