रत्नागिरी : इपीएफ पेन्शनर संघाच्यावतीने आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर येथील भविष्य निवृत्त निधीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून पेन्शनधारक या मोर्चात सहभागी झाले होते.
अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चात पेन्शनधारकांनी हातात फलक घेऊन विविध मागण्या मांडत घोषणा दिल्या. पेन्शनमध्ये वाढ, जुनी पेन्शन योजना लागू करणे, महागाई भत्ता देणे, पेन्शनधारकांसाठी आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. प्रा. राज बोथरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातून या मोर्चाचे नेतृत्व केले. जिल्ह्यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांची मागण्या मान्य न झाल्यास उम्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा या वेळी देण्यात आला.
पेन्शनधारकांनी महागाई भत्ता आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली. मोर्चाचे नेतृत्व अतुल दिघे, राज बोथरे, बाळकृष्ण कुलकर्णी, शांताराम पाटील, प्रकाश काळे, गोपाळ पाटील, महादेव दशिंगे, भाऊसाहेब यादव, प्रमोद परमाणे, सुजित शेळ, राजेंद्र बारस्कर आदींनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:52 AM 21/Mar/2025














