कोण ठरणार बिग बॉस मराठी-5 विजेता? उद्या रंगणार ग्रँड फिनाले

‘बिग बॉस मराठी-5’ चा विजेता जाहीर होण्यास आता अवघे काही तास उरले आहेत. गुलीगत फेम सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर या सहा सदस्यांनी अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे.

विजेत्याला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. अंतिम फेरीमध्ये धडक मारण्यापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर या घराबाहेर पडल्या आहेत. याआधी अरबाज पटेल, पंढरीनाथ कांबळे (पॅडी) घराबाहेर पडले होते. ‘बिग बॉस’ला नवा विजेता मिळणार असून यासाठी आता काऊंटडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे क्षणाक्षणाला चाहत्यांची उत्कंठा वाढत आहे.

बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची वेळ काय?

६ ऑक्टोबरला रविवारी, संध्याकाळी ६ वाजता, ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनचा ग्रँड फिनाले जल्लोषात पार पडणार आहे. ग्रँड फिनालेचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ६ ऑक्टोबरला या सीझनचा कोण विजेता होणार आणि ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून मनोरंजनाची नवी पर्वणी मिळाली. त्यामुळे सर्वांचं लक्ष ६ ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता असणार यात शंका नाही. अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर,  निक्की तांबोळी आणि धनंजय पोवार या सुपर ६ पैकी कोण जिंकणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.

Khabardar diwali fest

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:04 05-10-2024