चिपळूण : अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी गृहविभाग, जलसंपदा, पर्यटन व पर्यावरण या विभागांवर महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
अधिवेशनात चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी असलेल्या पोलिस ठाण्यासाठी अद्यावत इमारत उभारणे. वाशिष्ठी नदीपासून होणारी पूर हानी रोखण्यासाठी तयार केलेल्या प्रकल्पास शासनाने मंजूरी द्यावी. वाशिष्ठीतील खासगी जमीन शासनाने खरेदी करून नदीतील गाळ काढावा. चिपळूण शहरासाठी आखलेली ब्ल्यू लाईन, रेड लाईनचे पुनः सर्वेक्षण करावे. कोकणातील तेलेवाडी व उमरे धरण दुरुस्त करून ते नागरिकांसाठी उपलबद्ध करावे. संगमेश्वरातील गडगडी लघु प्रकल्पांतर्गत कालव्यांसाठी बंदिस्त पाईप लाईन धोरण आखणे. कोकण पर्यटन वाढीचा विचार करताना आवश्यक रस्ते, पूल, वीज कनेक्शन मुंबई गोवा महामार्ग व प्राधान्याने विचार करावा, असे निकम यांनी नमूद केले.
इतर पायाभूत सुविधा यांचा ते पुढे म्हणाले की, कोकणातील लोककलांना शासकीय सन्मान देण्यात यावा. कोकण पर्यटन महामंडळ स्थापन करून ग्रामीण पर्यटन व कृषी पर्यटन यांना चालना द्यावी. कोकणातील फॅक्टरींचे पाणी नद्यांना सोडल्याने नदी प्रदूषित होत असल्याने त्यावर कडक शासकीय धोरण निश्चित करावे, हे प्रश्न उपस्थित करून ते तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 21/Mar/2025














