उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर ३ एप्रिलपासून धावणार विशेष गाड्या

रत्नागिरी : उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत या गाड्या धावणार आहेत.

याबाबत कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी-करमळी विशेष (साप्ताहिक) ही १० एप्रिल २०२५ ते ०५ जून २०२५ दरम्यान दर गुरुवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री १२ वा. २० मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता गोव्यात करमळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ कार्मळी मुंबई सीएसएमटी विशेष (साप्ताहिक) १० एप्रिल २०२५ ते ५ जून २०२५ दरम्यान करमळीहून दर गुरुवारी दुपारी २ वा. १५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची रचना : एकूण २२ डबे : टू टायर एसी १, श्री टायर एसी ५. स्लीपर १०, जनरल एसएलआर – २. ४,

दुसरी विशेष गाडी क्र. ०११२९ लोकमान्य टिळक (टर्मिनस) करमळी विशेष (साप्ताहिक) दर गुरुवारी १० एप्रिल २०२५ ते ५ जून २०२५ या कालावधीत लो. टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२ वाजता ती गोव्यात करमळीला पोहोचेल. गाडी क्र. ०११३० करमळी लोकमान्य टिळक टर्मिनस) विशेष (साप्ताहिक) दर शुक्रवारी ११ एप्रिल २०२५ ते ६ जून २०२५ दरम्यान करमळीहून दुपारी अडीच वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम थांबे घेणार आहे.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी डबेः
फर्स्ट एसी – १, टू. टायर एसी २, श्री टायर एसी – ६, स्लीपर ८, जनरेटर कार – ०२. तिसरी साप्ताहिक गाडी क्र. ०१०६३ लो. टिळक टर्मिनस- तिरुवनंतपुरम विशेष ३ एप्रिल २०२५ ते २९ मे २०२५ दरम्यान दर गुरुवारी लो. टिळक टर्मिनसहून सायंकाळी ४ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री १० वा. ४५ मिनिटांनी तिरुवनंतपूरम उत्तरला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही विशेष गाडी (०१०६४) तिरुवनंतपूरम उत्तर लो. टिळक टर्मिनस येथून ५ एप्रिल ते ३१ मे २०२५ या कालावधीत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तरहून सायंकाळी ४ वा. २० मिनिटांनी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून २५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, कार्मळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, सुरतकल, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कण्णूर, कालिक्त, तिरूर, शोरानूर जंक्शन, त्रिसूर, एर्नाकुलम टाऊन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगजूर, मावेलिकरा, कार्यकुलम आणि कोल्लम जंक्शन हे थांबे घेणार आहे. डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी डवेः टू टायर एसी- १. श्री टायर एसी ६, स्लीपर ९, जनरल ४, जनरेटर कार १, एसएलआर – १.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:58 PM 21/Mar/2025